आदित्य महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी दिली दहिफळ येथील शेतकऱ्यांना  बोर्डो पेस्ट बद्दल माहिती




आदित्य महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी दिली दहिफळ येथील शेतकऱ्यांना  बोर्डो पेस्ट बद्दल माहिती.

बीड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत आदित्य शिक्षण संस्था सलंग्न आदित्य कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत प्रतीक विनोद पाटील, महेश शहादेव डरफे, बालाजी नामदेव आंबेकर, अक्षय धनाजी देशमुख, अनमोल दिपक जाधव, प्रतीक नागनाथ पाटील, सुशांत अकनवाड यांचे ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक कार्यक्रम २०२३ – २४ अंतर्गत कृषीदूतांनी बोर्डो पेस्ट बद्दल दहिफळ गावातील शेतकरी वर्गाला सविस्तर माहिती दिली. बोर्डो पेस्ट तयार करताना कळीचा चुना दगडरहित असावामिश्रण करताना धातूच्या भांड्याचा वापर करू नये, फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रममध्ये मिश्रण करावे, क्षारयुक्त पाणी वापरू नये, जर बोर्डो पेस्ट केलेली असेल तर ती जमिनीपासून १.५- २ फूट खोडाला वर लावावी आणि बुरशी व खोड रोग नियंत्रण संबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सर्वत्र अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळबागांवर पडलेल्या बुरशीजन्य रोगांवर एक प्रभावी उपाय म्हणून बोर्डो मिश्रणाचा उपयोग केला जात आहे. याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. कृषी दुतांना रोगनिदान विभागाचे विषयतज्ञ डॉ. ए.एच.केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या अभ्यास दौऱ्यास विद्यार्थ्यांना आदित्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आदितीजी सारडा मॅडम आदित्य कृषी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. तुकाराम तांबे, प्राचार्य श्री. शाम भूतडा, कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप मोरे, कार्यक्रम अधिकारी व विषयतज्ञ आणि महाविद्यालयाचा इतर प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा