माजलगाव तहसीलसमोर सुरूमगाव,डाके पिंपरी येथील सकल मराठा समाजाचे एक दिवसीय ठिय्या आंदोलन




माजलगाव तहसीलसमोर सुरूमगाव,डाके पिंपरी येथील सकल मराठा समाजाचे एक दिवसीय ठिय्या आंदोलन.
माजलगाव
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून तहसील समोर अमरण उपोषण चालू होते.हे उपोषण  स्थगित करून अमर उपोषण ऐवजी एक महिना ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. दि.१ आक्टोंबर रविवार रोजी माजलगाव तालुक्यातील सुरूमगाव, डाके पिंपरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.
 तहसील समोर गेल्या पंधरा दिवसापासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे, एक महिनाभर ठिय्या आंदोलन होणार आहे यात पंधराव्या दिवशी सुरूमगाव व डाके पिंपरी येथील सकल मराठा समाज बांधवांनी आंदोलन केले. सुरूमगाव व डाके पिंपरी येथील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी रविवार रोजी सकाळी सुरूमगाव, डाके पिंपरी ते माजलगाव मोटरसायकल रॅली काढून सकाळी दहा ते पाच तहसील समोर ठिय्या आंदोलन केले.या आंदोलनाला माजलगाव तालुक्यातील अनेकांनी पाठिंबा देऊन ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला होता.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा