छोटेवाडी (रामगाव) येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण




साखळी उपोषणात मुलींचा मोठा सहभाग.
माजलगाव
तालुक्यातील छोटेवाडी (रामगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांच्या स्मरणार्थ छोटेवाडी ( रामगाव) येथील गावकऱ्यांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषणाला दि.२९ सप्टेंबर शुक्रवार पासून सुरुवात करण्यात आली आहे.
  मराठा समाजाला हक्काचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी हे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.या अगोदर अनेक वेळा आरक्षणासाठी आंदोलने करण्यात आली.परंतु, शासनाने केवळ आश्वासन दिले.ते अद्यापही पूर्ण केले नाही.त्यामुळे छोटेवाडी येथील सकल मराठा समाजाने तीन दिवसांपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे.जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचा पवित्रा छोटेवाडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
   या आंदोलनात ग्रामस्थांसह शाळेतील मुलींनिही सहभाग घेतला आहे.याप्रसंगी छोटेवाडी येथील सकल मराठा समाजाची उपस्थिती होती
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा