माजलगाव शहरात तपस्वींची थाटात मिरवणूक




माजलगाव शहरात तपस्वींची थाटात मिरवणू
माजलगाव
शहरात सुरू असणाऱ्या चातुर्मास निमित्त काल रविवार दि ०१ ऑक्टोबर रोजी माजलगावात ज्यांनी ३१ दिवस,२१ दिवस,११ दिवस व ९ दिवस जैन उपवास केले त्यांची समस्त जैन संघाच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
प.पू.विवेकमुनीजी म.सा.यांचे सुशीष्य प.पू.सौरवमुनीजी म.सा., प.पू.डॉ.गौरवमुनीजी म.सा.,प.पू.सार्थकमुनीजी म.सा. तथा प.पू.सक्षममुनीजी म.सा. आदी ठाणा ४ यांचे माजलगाव शहरात जुन महिन्यापासून थाटात चातुर्मास सुरू असून या चातुर्मास दरम्यान समाजातील भाविक विविध उपवासाच्या तपस्या करत असून यामध्ये प.पू.सक्षममुनीजी म.सा.यांनी३१ निरंकार उपवास, सौ.कल्पा तालेरा यांनी २१ निरंकार उपवास,चंदा जाधव यांनी ११ निरंकार उपवास,संदेश दुगड यांनी ११ निरंकार उपवास, कु.पियुशी रानपरिया हिने ९ उपवास तर सौ.चैताली आब्बड यांनी ३१ आयंबिल उपवास केले यानिमित्त या सर्व तपस्वींचे अनुमोदन करण्यासाठी शहरातील दुगड अपार्टमेंट येथून राजस्थानी मंगल कार्यालय येथे शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी महिलांनी कलश व जैन धर्मातील पवित्र आगम ग्रंथ हातात घेऊन सहभाग नोंदवला.तसेच शोभायात्रेत युवक मंडळ व पुरुष मंडळी सहभागी झालेले होते.या शोभायात्रेनंतर राजस्थानी मंगल कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रमांनी व प.पू.डॉ.गौरवमुनी म.सा.यांच्या प्रवचनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शहरातील व परिसरातील भाविक-भक्त,प्रतिष्ठित नागरिक यांनी कार्यक्रमास हजेरी लावली.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा