हिंदवी स्वराज्य अर्बन संस्थेचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा




हिंदवी स्वराज्य अर्बन संस्थेचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.
माजलगाव
येथील हिंदवी स्वराज्य अर्बन संस्थेचा तिसरा  वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बँकेचे ग्राहक, ठेवीदार व कर्मचारी  उपस्थित होते.
ग्राहकांचे सहकार्य, योगदान व चांगल्या प्रतिसादामुळे या संस्थेने मोठी प्रगती केली आहे. बँकेच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. गृहकर्ज, वाहन कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुरेश सखाराम मोरे  यांनी केले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश किसनराव वामन, तसेच संस्थेचे उपाध्क्ष श्री उंबरे कमलाकर बाबासाहेब,जनरल मॅनेजर श्री नाईकनवरे अजय नारायणराव, मॅनेजर श्री बोले ताराचंद शाम, उत्कृष्ट फोटोग्राफर विजय डुकरे उपस्थित होते. तर संस्थेचे अध्यक्ष रमेश वामन  यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा