शेख मुहम्मदी सुलतान चे मास्टर ऑफ फार्मसी मध्ये घवघवीत यश

बीड

– येथील यशवंतराव बळवंतराव चव्हाण फार्मसी महाविद्यालयात नुकतेच पदवीदान दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यात शेख मुहम्मदी सुलतान ला विद्यापीठाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तिने मिळविलेल्या या यशाने औरंगाबादसह बीडच्या मानात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शेख मुहम्मदी सुलतान चे आजोळ बीड शहर. मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ तिचे मामा. म्हणून तिचे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण आजोळी बीड शहरातील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात झाले. वडील शेख सुलतान याकूब हे औरंगाबाद येथे इंडसुर गिअर्स लिमिटेड या कंपनीत मॅनेजर लॉजिस्टिक्स या पदावर कार्यरत आहेत. म्हणून तिचे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण चिकलठाणा, औरंगाबाद येथील श्री. बालाजी माध्यमिक शाळेत झाले. इयत्ता अकरावी व बारावी चे शिक्षण औरंगाबाद येथीलच छत्रपती उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. डी. फार्मसी चे शिक्षण श्री. धनेश्वरी मानव विकास मंडळ फार्मसी महाविद्यालयात झाले. बी. फार्मसी चे शिक्षण यशवंतराव बळवंतराव चव्हाण फार्मसी महाविद्यालयात झाले. तिथेच मास्टर ऑफ फार्मसी चे शिक्षण घेऊन सन २०२२ ला यात सर्वोत्तम रँक (ए डबल प्लस) मिळविली. याच बॅचचा पदवीदान दिन सोहळा यशवंतराव बळवंतराव चव्हाण फार्मसी महाविद्यालय, औरंगाबाद येथे नुकताच पार पडला. यावेळी मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष फरहात जमाल, प्राचार्य डॉ.एम.एच.देघान. अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) सहआयुक्त गिरीश हुकरे यांच्या हस्ते तिला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शेख मुहम्मदी ने फार्मसी शिक्षणात मिळविलेल्या या यशामुळे तिचे बीड येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंकुश चव्हाण, पर्यवेक्षक सानप सर, सानप मॅडम, बहिर मॅडम यांच्यासह आजी-आजोबा, सर्व मामा-मामी, मावशी, काका-काकू, भाऊ-बहीण यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हृदयी शुभेच्छा दिल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा

संबधित बातम्या

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="फॉलो करा" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

लेटेस्ट घडमोडी