गरजवंत मराठ्यांचा गोदाकाठचा नायक; मनोज जरांगे पाटील




महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून मराठा आंदोलनाची तीव्रता वाढत आहे मराठा क्रांती मोर्चा न सुरू केलेलं हे आंदोलन गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आणखीन तीव्र स्वरूपाचे होताना आपण पहात आहोत गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्रान पाहिल आहे की या ठिकाणचा प्रस्थापित समाज राजकीय पुढारी मराठा समाजाला खेळविण्यामध्ये आणि केवळ आश्वासन देण्यामध्ये भूलतापा देऊन फसवत आहेत हे आपण सर्वांनी पाहिलं आहे , गोदाकाटी जन्म घेतलेल्या एका सामान्य परिवारातून आलेले आहे , फाटक्या व्यक्तिमत्वाने या आंदोलनाला धार देण्याचे काम आज होत आहे मराठा आरक्षणासाठी आनेक साखळी उपोषण गावी जाऊन त्यांनी केले, याच उपोषणाच्या माध्यमातून गोदाकाचे 123 गावांना एकत्र करून त्या ठिकाणी आवाज उठून आंतरवली सराटी येथे आमरण साखळी उपोषणण चालू केले आणि त्या ठिकाणी या क्रूर प्रशासनाने त्यांच्यावर त्यांच्या संपूर्ण गावकऱ्यावर लाठी चार्ज केला एका रात्रीमध्येच. हे आंदोलनाची तीव्रता पूर्ण राज्याला माहीत झाली संपूर्ण देशाने ती बघितली आणि त्यानंतर हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये घराघरात पोहोचले गेले हे आपन पाहिलं एवढा मोठा संघर्ष होता हजारो लोक दररोज अंतरवली सराटीमध्ये येत होते महिला जखमी होत्या लहान मुलं जखमी होते बंदुकीचे छरे काही मुलांच्या पोटात पायामध्ये घुसले होते तरी हा माणूस न डगमगता सर्व पत्रकारांना सर्व समाजाच्या अभ्यासु लोकांना प्रशासनाला उत्तर देत होता ही वाखानन्यासारखी गोष्ट आहे , जे काही बोलायचं ते स्पष्ट स्टेजवरच बोलायचं बाजूला जाऊन बोलायचं नाही, माझ्या अटी मान्य केल्या तरच मी तुमच्याशी बोलेल हा कडकपणा सत्ताधारी पक्षाला आमदार असो मुख्यमंत्री असो त्यांना समोरासमोर बोलण्याचं धाडस , सर्वांशी बोलताना तेवढाच सन्मान तो मोठा असो किंवा लहान असो स्टेजवर बसूनच बोलायचं तिथेच बोलायचं हा त्यांचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि म्हणून महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत आज जरांगे पाटील झाले आहेत पहिल्यापासूनच त्यांनी सांगितलं की ही लढाई सामान्य माणसाची आहे गरीब मराठ्याची आहे मराठा समाजातील एकूण प्रस्थापित सोडले तर 98% समाज हा गरीब आहे जवळपास 30 ते 40 टक्के लोक हा भूमीहिन आहेत आणि उरलेला समाज हा अत्यंत सामान्य हालाखीचे परिस्थितीचे जीवन जगत आहे हे जीवनमान संपूर्ण महाराष्ट्राला प्रशासनाला सुद्धा माहित आहे, परंपरेने घटणारी जमीन शिक्षणामध्ये नसलेले प्रमाण आर्थिक परिस्थितीचे विवनचित पडलेली कुटुंब, नेहमी असणारा दुष्काळ बाकी सर्व समाजाला शासनाच्या सवलती मिळतात फक्त मराठा समाजांना या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवण्याचे महा पाप आजपर्यंतच्या पुढार्‍यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला सर्व दिसून येते याचाच परिणाम म्हणून सामान्य गरजवंत मराठा आज मनोज जरांगे पाटलांचा आवाज आला की होकार देऊन एका एका हाके सरशी अंतरवाली सराटी येथे अगदी करोडो लोकांच्या प्रमाणामध्ये आलेला आपणास दिसून येतो त्याचं कारण आहे की या समाजामध्ये आज अन्यायाचि अत्याचाराचि समाजामध्ये आज एक जाणीव मना मनामध्ये भरलेली खास करून दिसून येते, या समाजातील तरुण मुलं महिला विद्यार्थी हे फार अडचणीत आहेत यांच्यावर यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालाय की सरकार आणि या ठिकाणचे प्रशासन आपल्यावर अन्याय करत आहे शिक्षणासाठी पैसे नाहीत ,कुटुंबामध्ये पैसा नाही ,जमीन नाही आणि संपूर्ण सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाल्यामुळे या समाजातील मुलं विद्यार्थी आज नैराशीच्या जीवन जगताना दिसून , हे सर्व आज घडत आहे परंतु तरीही प्रस्थापित मराठा समाजातील पुढारी या मराठा आरक्षणाच्या चळवळीला काही पुढारी विरोध करताना दिसतात जे स्वतः कोकणचे राजे आहे ज्यांनी स्वतःच्या पुढच्या पंचवीस पिड्यांच भलं करून ठेवल आहे, जे सोन्याच्या ताटामध्ये आणि सोन्याच्या चमच्याने जेवण करतात त्यांना या गरीब मराठ्यांच्या हालाखीच्या जीवनाची परिस्थिती तरी काय माहित आहे हा मोठा प्रश्न समाज माध्यमातून आज होताना दिसून येतो , त्याचबरोबर काही प्रस्थापित राजकीय घराणं यांना माहिती आहे की मराठा समाजातील मुल जर शिकली तर पुन्हा आपले राजकीय दुकानदारी बंद होईल ,म्हणून या मराठा समाजाला पुन्हा अशिक्षित ठेवण्याचे महापाप काही राजकीय घराण्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेल आहे हे आता महाराष्ट्रातील तमाम मराठा गरीब मराठ्यांच्या लक्षात आलेल आहे आणि म्हणून त्यांच्या विचाराला होकार न देता , जरांगे सारख्या एका सामान्य परिस्थितीतून आलेल्या नेतृत्वाच्या हाकेला हाक देण्यास आज समाज तयार आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि आज होताना दिसून येत आहे, गेल्या दोन दिवसापासून काही राजकीय पुढारी म्हणतात की मराठा आणि कुणबी हे दोन वेगवेगळे प्रवर्ग आहेत मराठाही कधीही जात नव्हती तर ते प्रदेशाचे नाव आहे मराठा ती तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा अशा पद्धतीचे महाराष्ट्राचे राहतात ते सर्व मराठा अशा प्रकारचे भौगोलिकता आपणास इतिहास दाखवतो हे माहीत असून सुद्धा ते मुद्दामहून बोलतायेत की कुणबी आणि मराठा वेगळे आहेत मराठा जातीच्या अनेक उपजाती आहेत त्यापैकी कुणबी ही एक उपजात आहे तसं पाहिलं तर शिवाजी महाराजांचं आजोळ जिजामातेंचे माहेर असणारे सिंदखेडराजा आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणचा सिंदखेड राजाचे सर्व ग्रामस्थ आणि पूर्ण जाधव परिवार हा कुंणबी आहे याचा अर्थ शिवाजी महाराजांचे मामा ( पुढील वंशज ) हे कुणबी या प्रवर्गामध्ये येतात, आणि त्या ठिकाणचे कोकणातील काही स्वतःला प्रस्थापित म्हणून घेणारे लोक आज म्हणतात की 96 कुळी वेगळा आणि कुणबी वेगळा म्हणजे तुम्हाला म्हणायचे तरी काय काय म्हणायचे तुम्हाला येथे आज समाज तुम्हाला माफ करणार नाही असं काहीही बोलाल तर महाराष्ट्राचा हा समाज संपूर्ण महाराष्ट्रीयन माणूस तुम्हाला आता शांत केल्याशिवाय स्वस्त बसवणार नाही, ही सध्या लोक माणसांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होताना दिसून येत आहे, आज मराठा समाज सामाजिक आर्थिक शैक्षणिक विवंचनेमध्ये सापडलेला आहे कुटुंबामध्ये अर्थकारण शून्य झाल आहे शिक्षण नाही सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत राजकीय पुढारी प्रस्थापित पुढारी या सगळ्यांमध्ये त्यांना पुन्हा अडचणीत आणण्याचे काम करीत आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापित पुढारी पैशाच्या जीवावर आणि जातीचे कार्ड दाखवून निवडून येतात आणि या समाजाला जुलमीत ठेवतात हे मोठे पाप यांनी आजपर्यंत केलेल आहे , हजारो कोटींच्या प्रॉपर्टी कमवणारे स्वतःला जाणता राजा म्हणून घेतात प्रस्थापित लोक आहेत ही निवडणुकीच्या वेळी जातीचे कारड बाहेर काढतात आणि हा गरीब मराठा वर अन्याय करण्याचे काम सातत्याने होत आलेल आहे यातूनच आता या सर्वांना विरोध म्हणून , मनोज जरांगे पाटलांनी हा आरक्षणाचा लढा स्वतःच्या हाती घेऊन या गरीब मराठा समाजाला जाग करण्याचे काम केलेले आहे, या सामाजिक प्रश्नासाठी स्वतःचे घरावर तुळशी पत्र ठेवून स्वतःची जमीन सामाजिक कार्यामध्ये विकून स्वतः समोर येऊन स्वतः कुठलाही प्रलोभनाला बळी न पडता या आंदोलनाचे नेतृत्व आज ते करत आहे ,आणि म्हणून सामान्य मराठ्यांनी गरजवंत मराठ्यांनी त्यांच्या खंबीरपणे त्यांना या आंदोलनामध्ये साथ दिलेली आहे खरंतर शासनाने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना 30 दिवसांचा वेळ दिला होता आता तो 30 दिवसाचा वेळ संपलेला आहे आता त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत हे सर्व महाराष्ट्र यांना माहित आहे परंतु सध्या तरी सरकार त्यांना खेळवण्याचा हा प्रश्न पुन्हा एकदा प्रलंबित ठेवण्याचे काम करते की काय अशी शंका सर्व अभ्यासकांना आज येत आहे पुन्हा काल परवा म्हणून जरांगे पाटलांनी आणखी पुन्हा एकदा जर माझ्या मागण्या मान्य नाही केल्या तर मी परत आमरण उपोषण करेल आणि ते आमरण उपोषण तुम्हाला परवडणार नसेल ते पेलणार नसेल झेपणार नसेल, असं सांगून टाकलं आता महाराष्ट्रासमोर हा प्रश्न आहे की अशा या फाटक्या तुटक्या सामान्य परिस्थितीतून आलेला असामान्य माणसाच्या शब्दाला जर महाराष्ट्र शासन झूलवणार असेल तर तमाम गरीब मराठा समाज शांत बसेल बसणार नाही ?असे वाटत कारण एका हाके सरसी दीड दोन कोटी लोक येतात, संपूर्ण महाराष्ट्राचा ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी दौरा केला त्यावेळेस हजारोंच्या लाखोंच्या संख्येने केवळ दिवसात नाही तर रात्री उत्तर रात्रीसुद्धा त्यांच्या सभा झाल्या यावरून लक्षात येते की प्रचंड समाजामध्ये प्रिय झालेला हा माणूस एका हाके सरशीला लाखोंनी लोक गोळा करू शकतो हे संपूर्ण देशांनी आज पाहिल आहे आणि म्हणून या माणसाचं जर जीवाचं काही बरं वाईट झाल तर ते महाराष्ट्र सरकारला परवडेल का? किंवा महाराष्ट्रामध्ये सामाजिक जीवन राजकीय जीवन महाराष्ट्र शासनाचे काय होईल ही भीती सुद्धा तमाम लोकांच्या मनामध्ये आहे, खरंतर ही लढाई आता परिवर्तनाची सामान्य माणसाने हातात घेतलेली गरिबांची लढाई आहे यामध्ये प्रस्थापित श्रीमंत लोकांचा सहभाग तसा 0% आहे आणि म्हणून आता या आंदोलनाला आंदोलनाची धार तीव्रता आणखी वाढलेली आहे आता प्रशासनासमोर चर्चेचे सर्व पर्याय संपलेले आहेत ज्याप्रमाणे कोंढाणा किल्ल्यावर सूर्याजीनं माघारी परत जायचा दोर कापला होता आणि सूर्याजीनी मावळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही आता एक तर लढून मरा किवा दरीत पडून मरा या दोन पर्याय पैकी एक पर्याय निवडा तसाच आता महाराष्ट्र शासनासमोर एकच पर्याय आहे एक तर आरक्षण द्यावेच लागेल नसता महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल! कारण ही परिस्थिती सर्वांना न परवडणारी असेल अशी चर्चा सर्वसामान्य माणसांमध्ये आज होताना दिसून येत आहे, हे पुढाऱ्यांचा आंदोलन नसून हे गरिबांच आंदोलन आहे आणि याच नेतृत्व आज म्हणजे जरांगे पाटील करीत आहेत मराठ्यांच्या गळ्यातल ताईत बनलेले आपणास दिसून येतात हे आंदोलन पैशाच्या जीवावर नसून समाजाच्या मनातल्या वेदनेवर आंदोलन उभ राहिलेल आहे हे आर्थिक वंचितांचा आंदोलन आहे, सामाजिक वचितांचा आंदोलन आहे शैक्षणिक वंचितांचा आंदोलन आहे स्वतःच्या जीवन मरनाच्या अस्तित्वाचा प्रश्न निकाली लावण्यासाठीच हे गरिबांच आंदोलन आपणास सर्वांना दिसून येत आहे, हा आता गरजवंताचा लढा झालेला आहे हे आता क्रांतीच स्फुल्लिंग पेटलेल आहे ज्यावेळेस वेदना जास्त होत असतात ,अन्याय अति होत असते त्यावेळेस या अन्यायातूनच कुठेतरी क्रांतीची बीज निर्माण होत असतात ,आणि या क्रांतीची सुरुवात एका सामान्य फाटक्या असामान्य नेतृत्वाने होत असते आणि म्हणून खऱ्या अर्थाने जरांगेचे नेतृत्व हे असा मान्य आहे त्या पद्धतीने गांधींनि स्वातंत्र्य आंदोलनांमध्ये आवश्यक पद्धतीने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेतृत्व केले त्याच पद्धतीने या तमाम मराठा समाजावर जो अन्याय होतोय या आंदोलनाचे नेतृत्व आज आणि त्याचपद्धतीने जरांगे पाटला सारखा एक सामान्य यातून आलेला व्यक्ती पण जो की असामान्य नेतृत्वाने परिपूर्ण आहे असा व्यक्ती आंदोलनाचे नेतृत्वात करताना दिसून येत आहे ते सांगतात की आंदोलन अहिसक पद्धतीनेच होणार आहे, जरांगे पाटलांना स्वतःच्या समाजाबद्दल कट्टर अभिमान आहे परंतु ते दुसऱ्या समाजाचा कधीही द्वेष करत नाहीत हे त्यांच्या समाज जीवनातून आपल्या लक्षात आलेल आहे, बोलायला अतिशय साधा व्यक्ती आहे परंतु समोरच्याचे षडयंत्र ओळखणारि ही व्यक्ती , स्वतःच्या ताकदीवर फिरून समाजाला जागृत करून त्यांनी आंदोलन उभ केल आहे, स्वतः पुढे होऊन स्वतः सर्व काही हाल भोगून जमिनीवर झोपून सर्व समाजाला मार्गदर्शन करणारा हा नेता असामान्य आहे, त्यांच्या जीवनामध्ये आक्रमकपणा आपण पाहिला आहे परंतु तो कट्टरपणा त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत नाही, दिसायला हा व्यक्ती भारदस्त नाही परंतु मनातून कुणासमोर झुकणारा हा व्यक्ती नाही, ते सांगतात की आंदोलन पोरासाठी आहे नवीन पिढींच्या शिक्षणासाठी आहे , घरच्यांनाही तेच सांगतात की आलो तर तुमचा आणि नाही आलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार रहा ,अशा प्रकारची व्यक्ती सध्याच्या जीवनमानामध्ये आपल्याला दिसून येत नाही हे सदभाग्य आहे या आंदोलनाचे की या मराठा समाजाचे असा व्यक्ती असं नेतृत्व या आंदोलनाला सर्व गरीब गरजवंत मराठ्यांना आज लाभलेल आहे आणि म्हणून त्यांच आंदोलन येत्या काही दिवसात पुन्हा एकदा आमरण उपोषणाच्या माध्यमातून आपणास समोर येणार आहे आणि प्रचंड लोकांच्या जनमानसामध्ये गळ्यात ताईत झालेली ही व्यक्ती ,आज प्रचंड लोकप्रिय झालेलीआहे नव्हे नव्हे जागतिक स्तरामधून यांच्या सभेची स्तुती होत आहे आणि या आंदोलनाची एक नोंद संपूर्ण जगाने संपूर्ण लोकांनी घेतली आहे ज्या त्या समाजामध्ये जरागे पाटलासारखा व्यक्ती असावा अशी प्रत्येक जनमानसामध्ये आज चर्चा होताना दिसून येत आहे एक सामान्यतून असामान्य व्यक्तिमत्व निस्वार्थपणे स्वतःच्या जीवनामधल त्याच समर्पण, त्याग बलिदान देण्याची तयारी समाजासाठी उभे राहण्याची तयारी आणि समाजामध्ये सामील होऊन समाजासारखे जीवन जगणारी व्यक्ती आज आपल्यासमोर आहे हे या पिढीच भाग्य आहे, आणि म्हणून आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाच्या माध्यमातून जर मनोज जरांगे पाटलांच्या जीविताच जर काही बरं वाईट झालं त्यांच्या जर केसालाही धक्का लागला तर या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र प्रशासनाला आणि येथील राजकीय पुढार्‍यांना घ्यावी लागेल कारण ते न परवडणारे उदाहरण त्यांच्यासाठी असेल आणि म्हणून जर जरांगे पाटलांचा केसालाही धक्का लागला तर याचे परिणाम फार भयानक महाराष्ट्रात होतील अशी सर्व जनमानसामध्ये चर्चा आहे , असुनही प्रशासनाला सुद्धा माहित आहे म्हणून वेळेचे आदी सावध होऊन हा सामाजिक प्रश्न कसा मिटवायचा हा सामाजिक प्रश्न कसा सोडवायचा हे प्रशासनातील धुरीनांना कळालं पाहिजे यासाठी लवकरात लवकर आता निर्णय घेण्याची गरज आहे कारण गरीब आणि गरजवंत मराठा आज जागा झालेला आहे ,आणि त्यांच्या जर नेतृत्वाला काही झालं तर याचे संपूर्ण परिणाम महाराष्ट्राला देशाला भोगावे लागतील की काय,? अशी परिस्थिती येणाऱ्या काळात येऊ नये आणि सद्बुद्धी या प्रशासनातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सर्व पक्षांना ईश्वराने सद्बुद्धी देऊन हा प्रश्न येत्या दोन दिवसांमध्ये कसाच मिटवता येईल हे त्यांनी आता ठरवलं पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ते महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीला महाराष्ट्राच्या संस्कृतीला परवडणार नसेल ही निश्चितच खर आहे अशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आज चर्चा होताना दिसून येत आहे पुन्हा एकदा या सामान्यतून आलेल्या गरिबांच्या गरजवंत मराठयाच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा या आंदोलनाला यश येण्यासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा …..
डॉ. गोविंद मस्के वडवणी ( ९४२३१७०१९७ )

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा