आदित्य शिक्षण संस्थेत इको फ्रेंडली आकाश कंदील स्पर्धा उत्साहात




आदित्य शिक्षण संस्थेत इको फ्रेंडली आकाश कंदील स्पर्धा उत्साहात
बीड ।
आदित्य शिक्षण संस्था सातत्याने राबवत असलेल्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो. विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्र, क्राफ्ट, हस्तकला क्षेत्राकडेदेखील करिअरची संधी म्हणून पहावे. असे प्रतिपादन चित्रकलेचे शिक्षण अतिक गाडे यांनी केले. ते शहरातील आदित्य शिक्षण संस्थेत आयोजित इको फ्रेंडली आकाश कंदील स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आदित्य शिक्षण संस्थेचे संचालक डॉ आदित्य  सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. मंगळवार दि. 07 नोव्हेंबर रोजी अतिशय उत्साहामध्ये ‘आकाश कंदील स्पर्धा’ इको फ्रेंडली वातावरणामध्ये व इको फ्रेंडली साधनांचा वापर करून स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी एकसे बडकर एक असे आकाश कंदील बणवले. यावेळी परीक्षक म्हणून चित्रकला शिक्षक अमित गाडे,सौ.  ढाकणे मॅडम यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना अमित गाडे म्हणाले की, आदित्य शिक्षण संस्थेत सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो. विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये दडलेल्या सुप्त गुणांना ओळखावे कला क्षेत्राकडेही करिअरची संधी म्हणून पहावे. यामध्ये मोठी वाव आहे. आदित्यच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या एकसे बडकर एक आकाश कंदीलाचे गाडे यांनी  कौतूक केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विनोद जिरे, सुरेश जाधव, हरिदास तावरे,सी. ए.कल्यानिजी सारडा यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचार्‍यांनी मोठे प्ररिश्रम घेतले.


आकाश कंदीलाच्या माध्यमातून सामाजिक संदेश
विद्यार्थ्यांनी आदित्य मध्ये पार पडलेल्या कंदील स्पर्धेत इको फ्रेंडली साधनांचा वापर तर केलाच त्याच बरोबर त्यांनी हे कंदील तयार करतांना अपली कलाकुसर सादर केली. त्यामाध्यमातून त्यांनी सामाजिक संदेशही दिला. यामध्ये ‘बेटी बचाव बेटी पढाव’,  ‘झाडे लावा झाडे जगवा’ ‘स्त्री भ्रूण हत्या’, तसेच विविध अभियांत्रिकी, फार्मसी शाखामधील माहिती , टाकाऊ वस्तू पासून सुद्धा विद्यार्थ्यांनी आकाश कंदील बनवले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा