नागपूर येथील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत माजलगावच्या खेळाडूंनी मारली बाजी!




नागपूर येथील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत माजलगावच्या खेळाडूंनी मारली बाजी!
अवनी कुलकर्णीला राज्यस्तरीय सुवर्ण पदक तर राष्ट्रीय स्पर्धेत जयसिंग तौर याला कांस्य पदक
माजलगाव ( पांढरपोटे ज्योतीराम ):- नागार्जुन टेम्पल, रामटेक खिंडसी रोड नागपूर येथे डु-सुतोकॉन कराटे आर्गनायझेशन इंडियाच्या वतीने आयोजित झालेल्या सातव्या राष्ट्रीय कराटे टाँर्नमेंट स्पर्धेत माजलगाव येथील अॅड. प्रमोद तौर यांचा मुलगा जयसिंग यास प्रथम रँकिंगमध्ये कास्य पदक देवून गौरविण्यात आले. तर अवनी विजय कुलकर्णी या विद्यार्थिनीला राज्यस्तरीय गोल्ड मेडल मिळाले. राष्ट्रीय कराटे टॉर्नमेंट स्पर्धेत विविध राज्यातील असंख्य स्पर्धक सहभागी झाले होते.
जयसिंग याचे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके, लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याचे चेअरमन विरेंद्र दादा सोळंके, व्हॉईस चेअरमन जयसिंगभैय्या सोळंके, जेष्ठ नेते कल्याणदादा तौर, अॅड. भानुदासराव डक साहेब तसेच जयसिंग याचे प्रशिक्षक चंद्रमणी डोंगरे सर आदींनी मनपूर्वक अभिनंदन करून यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या, जयसिंग तौर आवणी कुलकर्णी याचे राजकीय, सामाजिक सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा