माजलगाव एकता पत्रकार संघाचे मुकनायक पुरस्कार पत्रकार बाबा देशमाने व पत्रकार दत्तात्रय नरनाळे यांना जाहीर 




माजलगाव एकता पत्रकार संघाचे मुकनायक पुरस्कार पत्रकार बाबा देशमाने व पत्रकार दत्तात्रय नरनाळे यांना जाहीर 

विवीध क्षेत्रातील मान्यवरांचा माजलगाव भुषण पुरस्काराने होणार सन्मान

माजलगाव  प्रतिनिधी
येथील माजलगाव एकता पत्रकार संघाच्या वतीने मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार देण्यात येणार असुन मुकनायक पुरस्कारासाठी निर्भीड पत्रकार आरोग्यदुतचे संपादक बाबा देशमाने व बीड येथील दै. मराठवाडा पत्रचे संपादक दत्तात्रय नरनाळे यांना जाहिर झाला असुन माजलगाव भुषण पुरस्कार कुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीनराव नाईकनवरे, ॲड.भानुदास डक,रविंद्र कानाडे,रामराजे रांजवण,डॉ.गणेश आगे,सरपंच सौ.सिमाताई सोळंके,इम्रान ताहेर सलीम खान, तलाठी सुर्यकांत गवई, ग्रामसेवक महेश गेंदले यांना जाहिर करण्यात आले असुन या पुरस्काराचे वितरण
मुकनायक दिनाचे औचित्य साधून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहीती माजलगाव एकता पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार ज्योतिराम पाढरपोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

माजलगाव एकता पत्रकार संघाच्या
वतीने दरवर्षी पत्रकारीता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारासह माजलगाव तालुक्यातील सामाजिक कार्यात,आरोग्य रुग्ण सेवेमध्ये,उद्योजक, सहकारासह इतर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या बिड जिल्ह्याच्या व माजलगाव तालुक्याच्या मातीतील व्यक्तीस मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार देऊन गेल्या चार वर्षापासून सन्मानीत करण्यात येत आहे.यंदा या कार्यक्रमाचे ५ वे वर्ष असुन यावर्षी पत्रकारीतेतील योगदानाबद्दल निर्भिड पत्रकार तथा आरोग्य दुतचे संपादक बाबा श्रीहरी देशमाने व बीड दै.मराठवाडा पत्रचे संपादक दत्तात्रय सखाराम नरनाळे यांना मुकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आला असुन, माजलगाव भुषण पुरस्कारा मध्ये कुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीनराव नाईकनवरे (सामाजिक) ॲड.भानुदास डक (विधीज्ञ),श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र कानाडे (सहकार),शितल ज्वेलर्सचे संचालक रामराजे रांजवण (उद्योग),मातोश्री हाॅस्पीटलचे संचालक डॉ.गणेश आगे (आरोग्य), गंगामसला येथील सरपंच सौ.सिमाताई भालचंद्र सोंळके (आदर्श सरपंच),सागर कन्फेशनरीचे संचालक इम्रान ताहेर सलीम खान (माजलगाव भुषण),सुर्यकांत गवई (उत्कृष्ट तलाठी),महेश गेंदले (उत्कृष्ट ग्रामसेवक) यांना माजलगाव भुषण पुरस्कार जाहीर झाले असुन मुकनायक व माजलगाव भुषण पुरस्काराचे वितरण मुकनायक दिनाचे औचित्य साधून विविध नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती माजलगाव एकता पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार ज्योतिराम पाढरपोटे,पत्रकार वाजेद पठाण, पत्रकार अमर साळवे,पत्रकार राजेभाऊ पाष्टे,पत्रकार नय्युम आत्तार,पत्रकार वसंत परसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या भुमीपुत्रांचा होणार विशेष गौरव

माजलगाव शहरातील भुमीपुत्र राज्यात विविध वरीष्ठ पदावर अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले व राज्यातील विविध भागात माजलगावचा नावलौकिक करणारे अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकजकुमार वसंतराव जावळे, यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्याचे तहसीलदार डॉ.शिवाजी रामेश्वर मगर व परळी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात सहायक अभियंता-श्रेणी-२ म्हणून कार्यरत असलेल्या ईंंजी. दिपाली रामदास गिते यांचाही या कार्यक्रमात विशेष गौरव होणार असुन त्यांना माजलगाव भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा