डीएमईआर परिक्षेत कु.प्रतिक्षा शिराळेचे यश




डीएमईआर परिक्षेत कु.प्रतिक्षा शिराळेचे यश
बीड ।
बीड शहरातील प्रतिक्षा शिराळे यांची छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात नर्सिंग ऑफीसर पदावर निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रतिक्षा शिराळे यांच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असतांना स्वत:हा कर्तुत्व दाखवत परिस्थितीशी सामना करत हे यश त्यांनी संपादन केले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असुन त्यांच्या आई वडीलांचा मोठा सहभाग आहे. या पदावर निवड झाल्यामुळे त्यांचे भगवान कदम, अशोक कदम, संतोष कदम, प्रकाश शिराळे, रोहित कदम, राहुल जगदाळे यांनी सत्कार करुन पुढील कामास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल दैनिक मराठवाडा पत्र व अनेक मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा