गरजवंत मुलांच्या संगोपनासाठी कृती दलाची स्थापना; गरजवंत मुलांची माहीती कळवा-प्रा.ईश्वर मुंडे




किल्ले धारूर !

कोरोना महामारीत अनेक जण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.अशा वेळी त्यांच्या मुलांची देखभाल व सांभाळ करण्यासाठी नातेवाईक किंवा शेजारी टाळाटाळ करतात,असमर्थता दर्शवतात.दुर्दैवाने कांही मुलांचे दोन्ही पालक मृत्यू पावले तर मुले उघड्यावर पडतात.
अशा बालकांचे संपूर्ण संरक्षण,संगोपन,कायदेशीर हक्क व पुनर्वसन सुविधा मिळावी या साठी महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरावर महिला व बाल विकास विभागांतर्गत कृती दलाची स्थापना केलेली आहे.
आपल्या परिसरांत अशी गरजवंत बालके असतील तर चाईल्ड लाईन टोल फ्री क्र.१०९८,बील कल्याण समिती,बीड ७५८८१७९८४८,जिल्हा बाल संरक्षण ९४२३४७०४३७,बालगृह ९९२३७७२६९४,शिशुगृह ९४२२६५७१६४,महिला व बाल विकास मदत कक्ष ८३०८९९२२२२ या क्रमांकावर संपर्क साधून बालकांच्या संगोपनासाठी शासन उपक्रमाचा लाभ घ्यावा.असे आवाहन बाल कल्याण क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रा.ईश्वर मुंडे (९०९६६८८३६५) यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा