शिरूरचे आयडियल कोविड हॉस्पिटल ठरत आहे रुग्णांसाठी वरदान




 

ना नफा – ना तोटा तत्त्वावर चालू

शिरूर

वाढत्या कोरोना संक्रमणाचच्या काळात वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्याला संधी मिळेल तो हात धुऊन घेत असल्याचे दिसत आहे. मात्र शिरूर कासारच्या चार मित्रांनी एकत्र येऊन ना नफा – ना तोटा या तत्त्वावर आयडियल कोविड हॉस्पिटलची स्थापना केली आहे. या हॉस्पिटलची, तेथील यंत्रणेची आणि रुग्णांची पाहणी करून याठिकाणी दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल अँड. अजित एम. देशमुख यांनी प्रकाश देसरडा आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

दिवसेंदिवस कोरोना संक्रमण वाढत चाललंय. रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये फिस देखील मोठ्या प्रमाणात आकारली जात आहे. मात्र शिरूर तालुक्यात प्रकाश देसरडा आणि त्यांचे चार मित्र एकत्र येऊन सुसज्य अशा देसरडा यांच्या आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये हे रुग्णालय चालू करण्यात आले आहे.

चार मित्रांनी मिळून तीस लाख रुपये खर्च करून सुसज्ज असे कोविड सेंटर या ठिकाणी उभारली असून यात बारा अक्सिजन बेड आणि अडोतीस सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी बेड अशा पन्नास बेडची उभारणी करण्यात आली आहे.

शासनाने ऑक्सीजन बेडसाठी सात हजार पाचशे रुपये शुल्क ठरवलेले आहे. मात्र या ठिकाणी केवळ चार हजार रुपये शुल्क घेतले जाते. तर ऑक्सीजन नसलेल्या बेडसाठी शासनाने चार हजार रुपये प्रतिदिन दर ठरवलेले जर असताना या ठिकाणी दोन हजार पाचशे रुपये प्रति बेड घेतले जातात.

खासगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा पैसे घेतल्याच्या बातम्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित होत असताना हे रुग्णालय जिल्ह्यात वेगळे काम करत आहे. तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित स्टाफ या ठिकाणी सुसज्ज ठेवण्यात आला आहे. कोरोणाला हरवरण्यासाठी या चार जिगरबाज मित्रांमधील प्रकाश देसरडा यांचेसह डॉक्टर गणेश देशपांडे, डॉक्टर भागवत सानप, डॉक्टर प्रताप कातखडे, आणि आजिनाथ खरमाटे यांचा समावेश आहे. याठिकाणी औषधे देखील वाजवी दराने विकली जातात. रुग्णांना भोजन आणि अन्य सुविधा मोफत दिल्या जात आहेत.

कुरणा केअर सेंटर उभारणे वेगळे आणि अशा प्रकारचे हॉस्पिटल उभारून त्यात मोठ्या प्रमाणात सवलत देणे वेगळे आहे, ही देखील एक मोठी रुग्नसेवा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराच्या जवळपास निम्मी किंमत दर घेऊन रुग्णांना उपचार करून देणे, ही बाब देखील मोठी आहे. यामुळे देशमुख यांनी आयडियल कोविड हॉस्पिटल मधील दराप्रमाणे जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांनी देखील आपले दर कमी करावेत. रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा द्यावी, औषधी देखील कमी किमतीत द्यावी, असे म्हटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा