सैनिकी विद्यालयातील कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी प्रबोधन !!




प्रबोधनकार ह.भ.प. परमेश्वर महाराज माने यांचे मार्गदर्शन !

बीड – सैनिकी विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी ह भ प परमेश्वर महाराज माने यांनी प्रबोधना मधून सकारात्मक विचार रुजवले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बांगर व प्राचार्य डाके एस.ए. यांनीही रुग्णांना यावेळी मार्गदर्शन केले.
माजी मंत्री जयदत्तआण्णा क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी सैनिकी विद्यालयात २०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. डॉक्टर योगेशभैय्या क्षीरसागर हे जातीने वैयक्तिक या कोविड सेंटर कडे लक्ष देऊन आहेत. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजू मचाले सर यांच्याकडूनही रोज या कोविड सेंटरचा आढावा प्राचार्यांकडून घेतला जात आहे. कोविड या आजाराच्या भीती मुळे रुग्णांमध्ये मानसिक आजार बळावत असून हे भीतीचे वातावरण कमी करून या रुग्णांना दिलासा देण्यासाठी, आत्मविश्वास देण्यासाठी येथे प्रयत्न सुरू आहेत.
आजच्या कार्यक्रमाला सैनिकी विद्यालय कोव्हिड सेंटर प्रमुख तथा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बांगर साहेब, प्राचार्य श्री डाके एस.ए., हभप रामराव महाराज आवाड, बालासाहेब क्षीरसागर व नर्स विशाखा आरखडे, सावित्रा पातके,अनिता मुंडे, शेरी पार्वती व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री डाके सर यांनी केले तसेच पेशंटचा आहार कसा असावा याचे मार्गदर्शन डॉक्टर बांगर साहेब यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री बालासाहेब क्षीरसागर सर यांनी केले. सर्व मान्यवर व रुग्णांना चहापाणी देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा