मृत्यू पावलेल्या कोरोना रुग्णांवर तीन दिवस उपचार




नांदेड : खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.  एका रुग्णालयात मृत्यू पावलेल्या कोरणा बाधित रुग्णावर तीन दिवस उपचार करून एक लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला आहे. सिडको भागातील विणकर कॉलनीत राहणारे शिक्षक अंकलेश पवार हे कोरोनाचा संसर्ग झाल्याने दि.16 एप्रिल रोजी गोदावरी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. सिटी स्कॅन केला असता स्कोर 7/25 असा होता. त्यांचे आरोग्य उत्तम होते. मात्र डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला.

या दरम्यान दि.20 रोजी तब्यात अधिक खालावल्याने अंकलेश पवार यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रेमडेसिवीर इंजेक्शन देणे आवश्यक असताना दिले गेले नाही. यासाठी 35 हजार रुपये किमतीचे इंजेक्शन आणायला सांगितले. त्याच वेळी  रुग्णालयाकडून फिस भरण्यास सांगण्यात आले. मयत अंकलेश पवार यांची पत्नी शुभांगी पवार यांनी तक्रारीत नमूद केले. मात्र पैसे भरण्यास मुदत मागितली असता, 24 तारखेपर्यंत मुदत दिली गेली. शुभांगी पवार यांनी ऑनलाईन 50 हजार व नगद 40 हजार रुपये दि.24 रोजी सकाळी दहा वाजता भरले होते. पैसे भरल्याच्या दोन तासानंतर म्हणजे 12 वाजता रुग्णालयाकडून अंकलेश पवार हे मरण पावल्याचे घोषित करण्यात आले. कुटुंबियाकडून मृत्यू प्रमाणपत्र व डेड बॉडी देण्याची मागणी केली असता,ते रुग्णलयाकडून देण्यात आली.मृत्यू प्रमाणपत्र दुसर्‍या दिवशी तपासले. त्यावेळी अंकलेश पवार यांचा मृत्यू हा दि.21 एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता झाल्याची नोंद होती.

रुग्ण दि.21 रोजी दगावला असताना सुद्धा रुग्णावर उपचार सुरू होते. म्हणून मेडिकल बिल व रुग्णालय बिल उखळण्यात आले. त्याचसोबत मयत बॉडीचा अवमान केला असल्याची तक्रार केली. शुभांगी पवार यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली असता, न्यायालयाने गोदावरी रुग्णलयावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले, त्यानुसार मंगळवार दि.18 रोजी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अहवाल सादर करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. ज्यादा बिल काढून घेण्यासाठी रुग्णालयाकडून 24 रोजी मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले गेले.हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार असल्याची तक्रार मयत अंकलेश पवार यांची पत्नी शुभांगी पवार केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी अपर जिल्हाधिकारी परदेशी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा