मौजवाडी गावामध्ये सोडियम क्लोराइड फवारणी




बीड- प्रतिनिधी
कोरोना महामारी ने संपूर्ण जग हैराण झालेला आहे बीड तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोना महामारी मुळे सर्वसामान्य लोक अडचणीत सापडलेले आहेत या महामारीला रोखण्यासाठी प्रत्येक गावागावात ग्रामपंचायत च्या वतीने अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत बीड तालुक्यातील मौजवाडी या छोट्याशा गावामध्ये गेल्या अनेक दिवसांत पासून कोरणा चे पेशंट सापडत आहेत या कोरोना ला हरविण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच तेजाब चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांची संपूर्ण ग्रामपंचायत टीम कोरोना महामारी ला हरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 20/05/2021 रोजी संपूर्ण गावामध्ये सोडियम क्लोराइड ची फवारणी करण्यात आली तसेच गावातील सर्व नागरिकांना कोरोणाचे नियम पाळण्याचे आव्हान करण्यात आले.

सरपंच तेजाब चव्हाण यांनी गावातील लोकांना मास्क चे वाटप केल मौजवाडी मध्ये कोरोना चा शिरकाव होऊ नये म्हणून संबंधित ग्रामपंचायतीच्या वतीने अनेक उपाययोजना गेल्या अनेक दिवसापासून करण्यात येत आहेत या कामासाठी गावातील नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेले आहे गावांमध्ये सोडियम क्लोराइड ची फवारणी करत असताना ग्रामसेवक दुधाळ साहेब यांनी पण फार मोलाचे सहकार्य केले तसेच या कामासाठी उपसरपंच आबा जगताप, लक्ष्मण जाधव, अनिल जाधव, प्रभाकर ढेंबरे, गोपी ढेंबरे ,लक्ष्मण ढेंबरे , गुलाब टोने ,विकास जाधव, अशोक जाधव यांनी पण सहकार्य केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा