2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना जालण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डिवायएसपी) सुधीर खिरडकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले




 

Daily marathwada patra Team 

ओट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना जालण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डिवायएसपी) सुधीर अशोक खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आज गुरुवारी दुपारी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

सदर गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती तीन लाख देण्याचे ठरले होते. पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. 18 व 19 मी असे दोन दिवस लाचेच्या मागणीची पडताळणी केल्यानंतर आज गुरुवारी सापळा रचून पोलीस कर्मचारी संतोष अंभोरे यास तक्रारदार यांच्याकडून 2 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांच्यासह विठ्ठल खार्डे, संतोष अंभोरे यांच्या विरुद्ध कारवाई केली. या कारवाईमुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा