संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य पदी- सुनील महाकुंडे




 

बीड l संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी सुनील महाकुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . आमदार संदीप (भैया) क्षीरसागर यांचे खंदे समर्थक सुनील (दादा) महाकुंडे यांची संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी वर्णी लागली आहे .दीपक कुलकर्णी यांच्या ऐवजी सुनील महाकुंडे यांची बीड शहर संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे . सुनील महाकुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी यांना सदस्य पदांच्या बदलाबाबत एक पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाच्या कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन सू. वी उकिरडे यांनी बीड जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. बीड जिल्ह्यात सर्व स्तरातून सुनील महाकुंडे यांचे अभिनंदन होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा