चार मुलींनी आईच्या प्रेताला खांदा देऊन दिला मुखाग्‍नी





 

गेवराई : मौजे जांब (ता. शिरुर, जि. बीड) येथील रहिवासी लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे या माऊलीचे वृध्दापकाळाने दि. 20 मे  रोजी पहाटे निधन झाले. कोविडचा प्रादुर्भाव असल्याने जास्त मंडळी अंत्ययात्रेस जमा झाली नव्हती. त्यात लक्ष्मीबाई यांना मुलगा नसल्याने उत्तराधिकारी व खांदेकरी याची गरज न भासू देताच लक्ष्मीबाई यांच्या 4 मुली सुनिता केदार, विमलबाई केदार, शशिकला केदार आणि भीमाबाई मोरे या मुलींनी खांदा दिला.

कचराबाई खंडागळे या मुलीने सर्व उर्वरित तयारी केली. अंत्ययात्रा निघताना पाणि ताट घेऊन स्मशानाकडे शंकुतला सुतार या लहान मुलीने मार्गक्रमण करत नेले. त्याठिकाणी गावातील काही मंडळी, नातेवाईक यांच्यासमोर लक्ष्मीबाई यांच्या प्रेतास अग्नी दिला. या घटनेमुळे गावात व आसपासच्या परिसरात महिलांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संपत्ती, पैसा, घर, शेती यांचा उत्तराधिकारी पुरुष कोणताही नसून जे काही ठरवतिल ते आईच्या मुलीच ठरवतील. लक्ष्मीबाई यांचे सर्व जावई यांना कोणतीही बोलण्याची संधी एकाही मुलीनी दिली नाही. यातुन असे म्हणावे लागेल कि पुरुष प्रधान संस्कृतीला फाटा दिला गेला. यामुळे सर्व निवाडा, अंत्यसंस्कार आणि संसार सर्व क्षेत्र महिलांसाठी आज या घटनेने उघडे झाल्याचे दिसते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा