डीवायएसपीसह दोन कर्मचारी लाचेच्या जाळ्यात




जालना : अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डिवायएसपी) सुधीर खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचार्‍यांना आज गुरुवारी दुपारी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक पुरुष तक्रारदार (55)यांच्यावर दाखल असलेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती तीन लाख देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मराठवाड्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार न देता पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पुणे विभागाने दि.18 व 19 मे असे दोन दिवस लाचेच्या मागणीची पडताळणी केल्यानंतर, आज गुरुवारी सापळा रचून पोलीस कर्मचारी संतोष अंभोरे यास तक्रारदार यांच्याकडून 2 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
यावेळी गुन्ह्यात तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर अशोक खिरडकर (डिवायएसपी) वय-45 रा. प्लॅट नं.सी 202, ॠषीपार्क, अंबड चौकी, संतोष निरंजन अंभोरे रा. पोलीस लाईन जालना, विठ्ठल पुंजाराम खार्डे पो. कॉ. रा. मु.पो. कडवंचीवाडी, ता. जि. जालना यांच्या विरुद्ध कारवाई केली. या कारवाईमुळे पोलीस अधिकारी
व कर्मचारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  ही कारवाई उपअधीक्षक श्रीमती वर्षाराणी पाटील, पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पो.हवालदार नवनाथ वाळके, पो.कॉ. किरण चिमटे, पो.कॉ. दिनेश माने यांनी केली आहे.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा