श्रीगुरु बंकटस्वामी संस्थान धावले भक्तांच्या मदतीला




श्रीगुरु बंकटस्वामी संस्थान धावले भक्तांच्या मदतीला

रुग्णांसाठी उभारले मोफत कोविड सेंटर

नेकनूर दि.२०

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढू लागला असून बेड आणि ऑक्सिजनसाठी रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नेकनूरच्या श्रीगुरु बंकटस्वामी संस्थाच्या वतीने कोविड सेंटर साठी पुढाकार घेतला आसून कोरोनाबाधितांसाठी मोफत कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कोविड सेंटरचे उदघाटन आज (दि.२१) बंकटस्वामी संस्थांचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.नमिता मुंदडा तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नेकनूरचे सरपंच सौ रोहिणी दादाराव काळे यांची उपस्थिती राहणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसाला हजाराच्या घरात असून ग्रामीण भागात कोरोना विषाणूने हातपाय पसरले आहेत.बीड तालुक्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण निघत असून नेकनूरमध्ये रोज ५ ते १० रुग्ण आढळून येत आहे.त्या पार्श्वभूमीवर बंकटस्वामी संस्थानच्या वतीने नेकनूरमध्येच कोविड सेंटर सुरु व्हावे अशी इच्छा पत्रकार अशोक शिंदे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा बीड , बंकटस्वामी सांकृतिक मंडळ व अंबाजोगाईच्या मानवलोकच्या सहकार्यातून आजपासून नेकनूरमध्ये संत मदर तेरेसा इंग्लिश स्कुल नेकनूरमध्ये कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आज या सेंटरचे उदघाटन करण्यात येणार असून यावेळी डॉ.आर.बी.पवार, ए.एस.भंडारी , एपीआय लक्ष्मण केंद्रे, जी प सदस्य भारत काळे ,अनिकेत लोहिया, साबेर मौलाना, यांची उपस्थिती राहणार आहे.

 

पुण्यतिथी उत्सव समितीचा पुढाकार

नेकनूर च्या मोफत कोविड सेंटर साठी बंकटस्वामी पुण्यतिथी उत्सव समिती आणि अन्नदान कमिटी पुढाकार घेत असून या साठी भारत काळे , पांडुरंग होमकर ,विलास रोकडे , महेंद्र फुटाणे , कालिदास पाटील , चक्रधर शिंदे ,फुलचंद काळे , संजय शिंदे , शिवराम सोंडगे, उद्धव काळे, रामनाथ घोडके, रवींद्र काळे, जितेंद्र शिंदे, सचिन थोरात , सुरेश रोकडे , अशोक शिंदे , सय्यद जाहेद जमील , प्रशांत भोसले , आदी जण परिश्रम घेत आहेत.

 

कोविड सेंटर रुग्णांसाठी संजीवणी

सेंटरमध्ये रुग्णांना सकाळी ८.३० वाजता आयुर्वेदिक काढा , नाश्ता तर दुपारी १२ व रात्री ८ वाजता पौष्टिक भोजन दिले जाणार असून नाश्ता व जेवणात दररोज वेगवेगळ्या भाज्या , उसळी , मोड आलेले धान्य , दिवसभरात डॉक्टर्स चार वेळेस येऊन रुग्णांची तपासणी करणार आहेत . शिवाय आरोग्य कर्मचारी देखील चोवीस तास याठिकाणी हजर असतात . या शिवाय योगा प्राणायाम ,संगीत , भजन आदी उपक्रम कोविड सेंटर मध्ये राबविण्यात येणार असल्याने हे कोविड सेंटर रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा