खतांचे दर जाहीर




बीड  ( मराठवाडा पत्र न्यूज ) : इंडियन फारमर्स फर्टिलायझर लिमिटेड कंपनीने 20 मे रोजी इफको डीएपी / एनपीके / एनपीएस खताची एमआरपी जाहिर केली आहे . त्यानुसार एनपीकेची 10:26:26 ची पन्नास किलो खताची बॅग 1175 रूपयांना मिळणार आहे . तसेच एनपीके 12:32:16 ची पन्नास किलोची एक बॅग 1185 रूपये , एनपीएस 20 : 20 : 0 : 13 च्या खताची पन्नास किलोची एक बॅग 975 रूपयांना तर डीएपी खताची पन्नास किलोची एक बॅग 1200 रूपयांना मिळणार आहे . दरम्यान ऐन पेरणीच्या तोंडावर खताचे भाव कमी केल्याबद्दल केंद्र सरकारचे शेतकऱ्यांमधून आभार मानले जात आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा