कोरोनो रूग्णाचा रूग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या 




बीड : कोरोना रुग्णाने रूग्णालयातच आत्महत्या केल्याची घटना बीड येथे घडली आहे. विशेष म्हणजे, रुग्ण आत्महत्या करत असताना सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे, रूग्ण आत्महत्या करत असाताना रूग्णालय प्रशासन झोपले होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. कोरोना व्यक्तीला धीर देण्यासाठी नातेवाईक आणि डॉक्टर दिवस-रात्र प्रयत्न करतांना दिसत आहे. त्यांना प्रत्येक वेळी भासू देत नाही येत, की ते कोरोना संक्रमित आहेत. त्यांना सामान्य रुग्णाप्रमाणे उपचार देऊन मनोबल उंचावत आहे. पण, बीडमधील या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, कुटुंबातील 35 वर्षीय तरुणाला गमावलेल्या कुंटुंबियांनी न्यायाची मागणी केलेली असून त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला.
बीड शहरातील नामांकित दिप रूग्णालयांमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेला तरुणाचे नाव रामलिंग महादेव सानप असे होते. हॉस्पिटल व्यवस्थापन बिलासंदर्भात रुग्णाला वारंवार विचारणा करत होते, त्यामुळेच माझ्या पतीने आत्महत्या केल्याचा आरोप मयत रामलिंग याच्या पत्नीने केला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा