मुख्यमंञी ठाकरेंनी 8 दिवस कोकणात राहून पंचनामे करावेत 




पुणे : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड हाणी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘धावता’ दौरा केला असून नुकसानाचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या धावत्या दौऱ्यावरुन भाजप नेत्यांनी जोरदार टीका केलेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंञी ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. पण त्यांनी 8 दिवस तिथे जाऊन राहावे. तिकडे वातावरणही चांगले आहे. हातात काठी घेतल्याशिवाय प्रशासन काम करत नाही, असे पाटील म्हणाले. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला हाणला आहे.

आता महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यानंतर अजित पवारांना विचारण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. मात्र, सो चुहे खाकर बिल्ली चली हज को. आपल्या पायाशी काय जळतय ते पाहा, अशा शब्दात पाटील यांनी अजितदादांना टोला लगावलाय. इतकेच नाही तर अजित पवारांनी उद्धव ठाकरेंनाही सल्ला द्यावा. 3 तासात पाहणी होत नाही. अजित दादांनीही 8 दिवस कोकणात जावं आणि त्यांच्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत, असे देखील पाटील यांनी म्हटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा