ग्रामीण भागातील जनतेने कोरोनाची ॲन्टीजेन टेस्ट करून घ्यावी- राजेंद्र मस्के




राजेंद्र मस्के यांच्या पुढाकारातून पिंपरगव्हाण ग्रामस्थांची ॲन्टीजेनटेस्ट करण्यात आल्या ।

बीड ।

       कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. कोरोनाचा संसर्ग शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांमध्ये जास्त दिसून येत आहे. यासाठी आता ग्रामीण भागातील गोरगरीब,कष्टकरी जनतेने आपली कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून वारंवार सूचना येत आहेत तरी देखील गावातील, वस्त्यावरील, तांड्यावरील लोक या सूचनेकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सामाजिक जाणीवेच्या भावनेतून आता राजेंद्र मस्के यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने गावोगाव कोरोना ॲन्टीजेन चाचणी करण्याची मोहीम सुरु झाली आहे. या अनुषंगाने बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण गावामधील ग्रामस्थांचे कोरोना चाचणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राऊत सर, डॉ.तनुजा शेटे, आरोग्यसेवक नितीन महुवाले, डॉ.विनोद बहीर सर, स्वरा पॅथॉलॉजि लॅब-प्रवीण मुळे मनोज आगे,आशासेविका श्री सविता आगाम मॅडम,अंगणवाडी सेविका श्री जेधे मॅडम,मदतनीस,श्री सोनसळे मॅडम, या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून हे शिबीर संपन्न झाले. शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच सचिन आगाम व युवा तरुणांनी अथक परिश्रम घेतले. या शिबिराला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन सहकार्य केले. आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी काही सूचना देण्यात आल्या यावेळी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेत असतांना स्वच्छता राखावी,गावात एकत्र येऊन सार्वजनिक कार्यक्रम करून नयेत, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर राखावे, आहारामध्ये पौष्टिक आहार घ्यावा .अशा सूचना देखील देण्यात आल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा