कोरना मुळे आर्थिक फटका बसलेल्या बारा बलुतेदारांना 3000 रूपये भरपाई द्यावी




 

बीड जिल्हा ओबीसी कांग्रेसी ची मुख्यमंत्री व ओबीसी मंत्री यांच्या कडे मागणी ।

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये मागील आडीच महीन्यापासुन कोरनाच्या वाढत्या प्रभावामुळे लाॅकडाऊन पडलेला आहे.यामुळे बारा बलुतेदार माळी,धोबी,न्हावी,कुंभार,लोहार,सुतार,रंगारी,तेली,कुरेशी,कोळी,बागवान,वाणी समाज अशा अनेक समाजाचे छोटे- छोटे व्यवसाय बंद पडलेले आहेत.यामुळे यावर पोट आसलेले हे छोटे छोटे समाज उघड्यावर आले आहेत.आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत.
राज्य सरकारने कोरनांच्या संकटामुळे आर्थिक आडचणीत आलेले कामगार रिक्षावले यांना आर्थिक मदत देवुन त्यांचे संकट काहीसे हालके केले आहे..याच धर्तीवर बीड जिल्ह्यातील,माळी,धोबी,न्हावी,कुंभार,लोहार,सुतार,रंगारी,तेली, कोळी,बागवान,वाणी असे छोट- छोट्या व्यवसाय करणारे बारा बलुतेदार समाजाला राज्य सरकारने 3000 ची आर्थिक भरपाई द्यावी. अशी मागणी बीड जिल्हा ओबीसी कांग्रेस च्या वतीने करण्यात येत आहे.तरी मुख्यमंत्री महोदय यांनी बारा बलुतेदार समाजाला तातडीने मदत द्यावी अशी मागणी वचिष्ट बडे. जिल्हा अध्यक्ष,पंकज कळसकर ,वडलणी,महादेव देवकर, तालुकाध्यक्ष, धारूर,,अशोक बहिरवाल,तालुकाध्यक्ष,बीड.
सचिन जाधव,तालुका अध्यक्ष , अंबाजोगाई,गणेश सेलुकर, तालुका अध्यक्ष, माजलगाव,अंबादास गोरे, तालुका अध्यक्ष,शिरूर,राम ढोणे, गेवराई,साजेदभाई कुरेशी, शहाराध्यक्ष,बीड,जावेद शेख, शहाराध्यक्ष, परळी इ.नी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब, व ओबीसीं मंत्री विजय वडेट्टीवार साहेब यांना केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा