कोरोनामुळे आयआयटी प्रवेश परीक्षा जेईई अॅडव्हांस 2021 स्थगित




नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे आयआयटी (IIT) प्रवेश परीक्षा जेईई (JEE) अॅडव्हांस स्थगित करण्यात आलेली आहे. आता ही परीक्षा कधी घेण्यात येणार आहे, याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. जेईई अॅडव्हांस  2021 परीक्षा 3 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली होती. ही प्रवेश परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. यंदा कोरोनामुळे जेईई मेन परीक्षा देखील घेण्यात आलेली नाही.
ऑफिशियल नोटिसीमध्ये असे  सांगण्यात आले आहे की, कोरोनाच्या कारणामुळे सध्याच्या महामारीच्या परिस्थितीला ध्यानात घेऊन जेईई (JEE) (अॅडव्हांस ) 2021 परीक्षा जी 03 जुलै, 2021 (शनिवारी) घेतली जाणार होती, ती स्थगित करण्यात आली असून परीक्षेच्या सुधारित तारखेची घोषणा योग्य वेळी करण्यात येणार आहे.
जेईई (Main) मे 2021 सत्रातील परीक्षेला स्थगिती, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची घोषणा
देशभरात JEE Advanced 2021 परीक्षा 3 जुलै 2021 रोजी घेतली जाणार आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून दिली होती. यावर्षी विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घेताना 75 टक्के ची पात्रता सुद्धा शिथिल करण्यात आल्याचे देखील पोखरियाल यांनी त्यावेळी सांगितले आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी आयआयटी प्रवेशासाठी बारावी परीक्षेत 75 टक्केची पात्रता शिथिल करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे JEE Advanced 2021 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला होता. मात्र आता ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.

2021 सत्रातील जेईई (JEE Main) मेन परीक्षाही आधीच स्थगिती : देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई (JEE Main) मेन 2021 सत्रातील परीक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे.  देशातील 23 आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced 2021 परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना JEE Mains 2021 परीक्षेला सामोरे जावे लागते. यावर्षी 4 सत्रामध्ये ही परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यास सवलत दिली गेली होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,मे 2021 या चार सत्रामध्ये जेईई मेन्स परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र या परीक्षांना यंदा स्थगित केले आहे.

नीट पीजी परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय : त्याआधी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट पीजी (NEET PG) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. NEET-PG किमान 4 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि परीक्षा 31 ऑगस्ट 2021 पूर्वी घेण्यात येणार नाही, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा