धारुर शहरात 5 दुकाने सील; प्रशासनाची धडक कारवाई




किल्लेधारुर । शहरात कोरोना निर्बंधात नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. नियम डावलून उघडी असलेली 5 दुकाने प्रशासनाने सील केली.

धारुर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसान दिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, प्रशासन नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना देत नियम डावलून उघडी असलेली 5 दुकाने प्रशासनाने सिल केली.

शहरातील रस्त्यांवर भाजीपाला-फळे विक्रेते हातगाड्या लावून विक्री करताना नियमाचे होत नसतांना दिसले.तहसीलदार व्ही.एस.शिडोळकर व नायबतहसीलदार रामेश्वर स्वतः तहसीलदार व नायब तहसीलदार रस्त्यावर फिरून त्यांनी आज शहरातील विविध 5 दुकाने सील केली तसेच विनाकारण फिरणारे नागरिक यांची अँटीजन टेस्ट केल्या आहेत

या धडक कारवाईमुळे तहसीलदार वंदना शिडोळकर ,नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर एस कांबळे ,पोलीस उपनिरीक्षक केदारनाथ पालवे, नगरपरिषद कर्मचारी सचिन डावकर ,माणिक लोखंडे सर्व जण कामाला लागल्याचे दिसून आले यामुळे आता निश्चितच धारूर तालुक्यात कोरोना रोखण्यास मदत होईल.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा