रेशन दुकानांमधून निकृष्ट धान्याचा पुरवठा; किडलेल्या गहुचे वाटप




 

साहेब हे धान्य माणसांना खायाल देता की जनावरांना?किल्लेधारुर । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन शासनाने जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने सामान्य लोकांना मदत म्हणून रेशनवर मोफत धान्य पुरवठा करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.शहरी भागातील जनतेला रास्त दुकानदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा होत आहे हे धान्य माणसांना खायाल देता की जनावरांना असा प्रश्न पडला आहे.

शहरातील जनतेला सध्या रेशनवर गहू, व तांदूळ दिला जात आहे, त्यात गहू अतिशय निकृष्ट असून, कुजलेला, सडलेला व किडलेला असल्याचे दिसून आले.

याकडे प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे शहरी भागातील नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात सातत्याने निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे सामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आला आहे, त्यामुळे त्यांना हे निकृष्ट धान्य घेतल्याशिवाय पर्याय नाही. शासनाकडूनच निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्यामुळे नागरिकांवर सडके धान्य खाण्याची वेळ आली आहे.

दुकानावर खराब आणि किडलेला गहू आलेला आहे परंतु काय करावे आम्हाला गोदाम किप्परच अर्धा चांगला आणी अर्धा खराब गहू देत आहेत नाविलाजाने आम्हाला तो माल ग्राहकांना द्यावे लागत आहे काही ग्राहकांच्या आम्ही अक्षरशा पाया पडायची वेळ येते विनंती करतो परंतू ग्राहक माल घ्यायला तयार होत नाहीत आम्ही कोणा कोणाला तोंड द्यावे जे अगोदर येतील त्यांना माल आम्ही देतो आणि जे शेवटला राहिले त्यांना तोराहिलेला खराब आलेला माल देतो.

..रास्त दुकानदार धारूर.

कोरोनामुळे आधीच जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून रेशन दुकानात विक्रीसाठी आलेल्या गव्हात मोठ्या प्रमाणात खडे,माती निकृष्ट दर्जा असल्याचे आढळून आले आहे. किमान रेशनवर मिळणारे धान्यतरी चांगल्या दर्जाचे मिळावे हीच जनतेची अपेक्षा असून शहरी भागातील रेशन दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असल्याचे लक्षात आले आहे; परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व त्यात प्रचंड महागाई असल्याने जनता हतबल झाली आहे. यामुळे शहरातील कित्येक कुटुंबे रेशनच्या धान्यावरच उदरनिर्वाह करीत आहेत. गोरगरीब जनतेसाठी संजीवनी ठरत असलेल्या धान्यातच भेसळ होत असल्याने नागरिकांनी काय खावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र शासनाने यासंबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सामान्य जनतेची होत असलेली थट्टा थांबवावी, अशी मागणी होत आहे.

नागरिकांना अनेक दिवसांपासून भेसळयुक्त धान्याचे वाटप होत आहे. त्यातही मका व गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा मिळत असल्याने सामान्य नागरिकांनी सडके व कुजके धान्य खावे का, दर्जेदार धान्याचे वाटप नागरिकांना करण्यात यावे.

सनी गायसमुद्रे, नागरिक

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा