देशभरात लसीकरणाने 20 कोटींचा टप्पा ओलांडला




नवी दिल्ली : कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशभरात राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेने महत्त्वचा टप्पा गाठला आहे. देशभरात लसीकरणाने 20 कोटींच्या पुढे आकडा ओलांडला आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भारताने सुमारे 15.7 कोटी लोकांना 20 कोटीपेक्षा जास्त लसीचे डोस दिले आहेत. त्यापैकी 11.3 कोटी लोकांना फक्त पहिला डोस मिळालाय, तर 4.35 कोटी लोकांना दोन्ही डोस दिले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सुमारे 20 कोटी डोसपैकी 20 टक्के लस आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. 18 ते 44 वयोगटातील 6.4 टक्के आणि उर्वरित 73.6 टक्के डोस 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देण्यात आले आहेत.

60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना एकूण 7.5 कोटी म्हणजे 5.7 कोटी लोकांना पहिला तर 1.8 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला, तर 45 ते 60 वर्षांदरम्यानच्या 7.2 कोटी लोकांना कोरोना लस दिली. यात 6.2 कोटींना पहिला डोस दिला गेला आणि 1 कोटींना दोन्ही डोस देण्यात आले.

या वयोगटातील आघाडीच्या कामगारांना 2.3 कोटी डोस म्हणजे 1.5 कोटी लोकांना पहिला डोस तर 84 लाख लोकांना दुसरा डोस दिलाय. आरोग्य कर्मचाऱ्यांना 1.6 कोटी डोस देण्यात आले त्यापैकी 98 लाख लोकांना पहिला तर 67 लाख लोकांना दुसरा डोस देण्यात आला. आकडेवारीनुसार, 18 ते 44 वयोगटातील लोकांना 1.2 कोटी डोस मिळाले आहेत, जे सर्वांसाठी पहिला डोस होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा