सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ – धनंजय मुंडे




उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेतनवाढीचा मुद्दा काढला निकाली

2388 अधीक्षक, 2858 स्वयंपाकी, 470 मदतनीस, 2388 चौकीदार आदींना होणार लाभ

मुंबई l सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणार्‍या अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीनंतर दिली आहे.

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार वसतिगृह अधीक्षकांना आता 9200 ऐवजी दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. स्वयंपाकी पदासाठी 6900 ऐवजी 8500 रुपये तर मदतनीस व चौकीदार पदांसाठी 5750 ऐवजी 7500 मानधन मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, विभागाचे सचिव श्याम तागडे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, आयुक्त प्रशांत नारनवरे, उपसचिव दिनेश डिंगळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सदर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी अनेक कर्मचारी संघटना गेल्या अनेक दिवसापासून करत होत्या. ही वाढ एक जुलै पासून लागू होणार आहे.

या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील 2388 अधीक्षक, 2858 स्वयंपाकी, 470 मदतनीस, 2388 चौकीदार अशा एकूण 8 हजार 104 कर्मचाऱ्यांना होणार आहे.

यांना लाभ मिळणार असून, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी यासाठी वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा