प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने गरजूंना खाद्य किटचे वाटप




बीड । महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या संम्यक विचाराने प्रेरित होऊन व मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दर्शवलेल्या धम्म विचारी मार्गाने सुसामाजिक कार्य बीड जिल्ह्यातील प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून होत आहे. बालसंस्कार शिबिर, महिला संस्कार शिबिर, श्रामनेर शिबिर,धम्म सोहळा, महापुरुषांच्या विचारांचा जागर इत्यादी प्रमाणे समाज सबलीकरणाचे अनेक कार्यक्रम सातत्याने घेतली जातात.
मागील दीड वर्षापासून कोवीड-19 या आजाराने देशात थैमान घातले व मानवाचा दैनंदिन जीवन मार्ग विखुरला गेला. व्यावसायिकांचे व्यवसाय बंद झाल्याने आर्थिक दुर्बलता निर्माण झाली. अनेकांवर उपासमारीची वेळ ओढावली.प्रत्येकाला पोटभर अन्न मिळावे या उद्देशाने अनेक सामाजिक संघटनांनी, संस्थांनी व दानशूर व्यक्तींनी अन्नदान करून आपले दानत्व सिद्ध केले.
याप्रमाणेच प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था, बीड च्या वतीने अनेक वेळा गरजवंतांना अन्नधान्याचे खाद्य किट वाटप करण्यात आले आहे. सद्यस्थितीत दिनांक 07 जून 2021 रोजी संस्थेचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, सचिव पूज्य भिक्खु धम्मशील, उपाध्यक्ष आयु.प्रा. प्रदीप रोडे व सर्व कर्मचारी, सदस्य यांच्या उपस्थितीत 50 गरजू कुटुंबांना खाद्य किटचे वाटप करण्यात आले आहे.सामाजिक आत्मभान बाळगून भुकेलेल्याला अन्न देऊन त्याच्या पोटाची भूक भागवणे बरोबरच वेगवेगळ्या उपक्रमातून वैचारिक ज्ञान व सम्यक विचार सर्वांना दिले जातात. मुख्यत्वे दान पारमिता ही संकल्पना प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने सातत्यपूर्वक पाळली जाते.
या उपक्रमाचे बीड जिल्ह्यातून स्वागत होत आहे. या त्यांच्या संम्यक विचारी कार्याला शुभेच्छा.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा