सुशिक्षित नोकरदाराला गंडवले भामट्याने दीड लाखाला लावला चूना




सुशिक्षित नोकरदाराला गंडवले
भामट्याने दीड लाखाला लावला चूना
बीड । प्रतिनिधी
सायबर पोलिस वारंवार आवाहन करुनही याकडे दुर्लक्ष करत आपल्याला आलेला टोटीपी अनोळखी व्यक्तीला सांगून दिड लाखाला स्वत: फसवून घेतल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी सुशिक्षित नोकरदाराने दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल अच्यूतराव कदम (रा. शिवाजीनगर, बीड) हे पुणे येथे नोकरीला आहेत. 15 ऑगस्ट रोजी बीड येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर एकाने फोन करून ‘तुम्हाला लिंक पाठवली आहे, त्या लिंकद्वारे केवायएसी अपडेट करून घ्या, त्यामध्ये आलेला ओटीपी मला सांगा`, असे सांगितले. सुशिक्षित नोकरदाराने कशाचीही पडताळणी न करता आलेला ओटीपी त्या भामट्याला सांगीतला आणि त्याच्या अकाऊंटवरून 1 लाख 39 हजार 900 रुपये कपात झाले. ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडली. आपल्या फसवणूक झाल्याचे राहूल कदम यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस गाठून भामट्याविरोधात तक्रार दाखल केली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा