किरकोळ कारणावरुन एकास मारहाण




किरकोळ कारणावरुन एकास मारहाण
आष्टी । प्रतिनिधी
जुण्या वादाची कुरापत काडून एकास तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहान करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला ही घटना 8 ऑगस्ट रोजी घडली.
आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथील आप्पा साहेबराव बोखारे (वय 41) या रिक्षा चालकाने आष्टी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते चोभानिमगाव येथील पाचपुते यांच्या खताच्या दुकानासमोर उभे होते. या वेळी अंबादास भीमराव जाधव, परसराम भीमराव जाधव, भीमराव जाधव (सर्व रा. चोभानिमगाव) तेथे आले, त्यांनी काही एक न सांगता मारहाण करण्यास सुरुवात केली. हातातील दगड डोक्यात घालून गंभीर जखमी केले व जिवे मण्याची धमकी दिली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा