विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, अत्याचार करुन हाकलून दिले, पिडितेच्या फिर्यादिवरुन शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल,आरोपी फरार




बीड :
पतीने मारहाण केल्याने विभक्त झालेल्या महिलेला एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर स्वत:च्या मालकीचे घर किरायाने दिले. मात्र त्यानंतर अत्याचार करुन हाकलून दिले. ही 23 ऑगस्ट रोजी बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार पीडिता ही 26 वर्षीय असून ती (भिगवण, ता.बारामती) येथे राहत होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी पतीने तिला मारहाण केली, त्यामुळे दोन मुले पतीजवळ ठेऊन मुलीसह पीडिता बीडमध्ये आली. मुलीला शिक्षणासाठी वसतिगृहात ठेवले तर ती एका हॉटेलात स्वयंपाकाचे काम करु लागली. या दरम्यान तिची विराज जगतापशी ओळख झाली. त्याने 2020 मध्ये पीडितेला जालना रोडवर स्वत:ची खोली तिला किरायाने दिली. 15 नोव्हेंबर 2020 रोजी त्याने तिला भावनिक करुन बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर वेळोवेळी त्याने लैंगिक शोषण केले. मात्र त्यानंतर तिला घराबाहेर काढले पिडितेने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून आपली तक्रार नोंदवली त्यानूसार 23 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा