हरवलेले मोबाईल मुळ मालकास बीड पोलिसांनी मिळवुन दिले परत




हरवलेले मोबाईल मुळ मालकास बीड पोलिसांनी मिळवुन दिले परत

बीड : –
जीवनाचा अविभाज्य अंग झालेल्या मोबाईल शिवाय राहणं अनेकांना कठीण आहे. त्यातच आपल्या जिवनातील अनेक आठवणी, व्यवसायातील महत्त्वाची कागदपत्रे व इतर महत्वाची माहिती, फोटो साठवण्यासाठी आपण मोबाईलचा वापर करतोच. अशा परिस्थितीत मोबाईल हरवला तर त्याच मोठं दुःख असतं. आणि आपला हरवलेला मोबाईल परत मिळाला तर त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. असंच बीड पोलीसांच्या टेक्नीकल शाखेच्या प्रयत्नांना यश आले. हरवलेले १७ मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने शोध घेवून ते मा. पोलीस अधीक्षक साहेब बीड यांचे हस्ते मुळ मालकांना सुपुर्द करण्यात आले.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकुर, मा. अपर पोलीस अधीक्षक बीड श्री सुनिल लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीमती क्रांती ढाकणे, पोलीस अंमलदार सलीम शेख, विकी सुरवसे, ऋषीकेश पोटे, शंकर डोंगळे यांनी केलेली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा