जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात अन्नदान व फळ वाटप कै. संजय बारस्कर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम




जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात अन्नदान व फळ वाटप
कै. संजय बारस्कर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम
बीड । प्रतिनिधी
सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे व आपल्या कार्यामुळे सर्व बीड जिल्ह्यात परिचित असणारे कै. संजय बारस्कर यांचे नुकतेच निधन झाले. व त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत बीड येथील जिव्हाळा बेघर निवारा केंद्र येथे फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता .
संजय बारस्कर यांनी आपल्या सामाजिक कार्यातून जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे सामाजिक कार्य पुढे सुरुच ठेवण्याचा प्रयत्न यांच्या नातेवाईकांमधून होत आहे. त्यांच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रम राबवून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. बीड येथील जिव्हाळा बेघर निवारा केंद्र येथे फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संजय वाघमारे, सुरेश पिंगळे, सुहास पाटील, मुकुंद भालेकर, आप्पा जगताप, किरण भोसले, अशोक दादा ढोले पाटील, शरद झोडगे,जिव्हाळा केंद्राचे संचालक राजू वंजारे सर व राष्ट्रीय खेळाडू कै. अमोल बारस्कर मित्रपरिवार, बीड आदी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा