मुलाने बापावर झाडल्या तीन गोळ्या





आष्टी ! शहरातील विनायक नगर भागामध्ये जन्मदात्या बापावर पोटाच्या मुलाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी ( दि .20 ) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली.आष्टी पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पुढील तपास करीत आहेत . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , संतोष किसन लटपटे ( वय -50 ) असे जखमी इसमाचे नाव असून त्यांच्यावर पोटचा मुलगा असलेल्या किरण संतोष लटपटे ( वय -24 ) याने घरगुती वादातून तीन गोळ्या झाडल्या.यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर झाडण्यात आल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते , यातून घरात सातत्याने छोटे – मोठे वाद होत असत यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले असून आरोपीची सध्या कसून चौकशी सुरु आहे . तीन महिन्यापूर्वी झाले होते सैन्य दलातून निवृत्त दरम्यान संतोष लटपटे हे तीन महिन्यापूर्वी सैन्य दलातून निवृत्त झाल्याची माहिती आहे.त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता.गुरुवारी सायंकाळी या बंदुकीतुनच पोटाच्या मुलाने तीन गोळ्या झाडल्या.यातील दोन गोळ्या या त्यांच्या पोटात गेल्या तर एक गोळी हुकली असल्याची माहिती पोलिसांनी दिली . आईला मारहाण झाल्याने राग अनावर किरण लटपटे याने आपल्या पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की , त्याचे वडील संतोष लटपटे यांनी दारू पिऊन  आईला मारहाण सुरु केली होती , यानंतर मला राग अनावरण झाल्याने गोळी झाडली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा