सरकारचे हे धोरण शेतकऱ्यांचे मरण ठरेल – गणेश बजगुडे पाटील”




रासायनिक खतांच्या दरवाढीचा शिवक्रांती संघटनेकडून तीव्र निषेध
बीड!
जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आधीच हवालदिल झालेला असताना केंद्र सरकारने केलेली रासायनिक व मिश्र खतांची भाववाढ ही अन्यायकारक व निषेधार्ह असून शिवक्रांती संघटनेच्या वतीने या दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात येत असून खतांचे वाढलेले दर तत्काळ कमी करावेत नसता “सरकारचे हे धोरण शेतकऱ्यांसाठी मरण ठरेल” आशी प्रतिक्रिया शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी दिली.
देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता शेतकरी आधीच संकटात सापडलेला आसताना लॉकडाऊन मुळे फळबागा, भाजीपाला बेभाव विकावे लागत आहेत. शेतमालाला बाजारात कसलाही भाव नाही, त्यातच अतिवृष्टी, गारपीट, वादळवारा यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले प्रचंड नुकसान, पेट्रोल डिझेलच्या दर वाढीमुळे मशागतीचे दरही नेहमी पेक्षा वाढलेले आहेत. आश्या परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मदत करणे, आधार देणे सोडाच परंतु खरीपाची पेरणी तोंडावर आलेली असताना 50 किलो मागे 500 ते 700 रुपयांनी खताची दरवाढ करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप गणेश बजगुडे पाटील यांनी केला आहे. खरीप हंगाम जवळ आलेला असताना शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केलेली आहेत. आशा परिस्थितीत खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक व मिश्र खतांच्या किमतीमध्ये केलेली प्रचंड दरवाढही अन्यायकारक आहे. एकीकडे “अच्छे दिन” चे स्वप्न दाखवत सत्तेत आलेले हे सरकार आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे, दिलासा देने सोडून खतांची प्रचंड दरवाढ करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटण्यचे काम करत अासेल तर मोदीजी हेच का आपले आच्छे दीन म्हणण्याची वेळ आली आहे. रेडिओच्या माध्यमातून आपली “मन की बात” सूनवणाऱ्या या सरकारला आमच्या शेतकऱ्याच्या मनाच्या भावना समजायला हव्या होत्या. शेतमालाला योग्य तो हमी भाव द्यायचा होता, पीकविमा, नुकसान भरपाई भरीव व वेळेवर द्यायला हवी होती, कोरोना काळात शेतकऱ्यांना सवलत किंवा योजना आणायची होती परंतु अासे काहीच नकरता शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटण्यासाठी पेरणीच्या तोंडावर खताचे प्रचंड भाव वाढवले गेले या भाववाढीचा शिवक्रांती संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करून खतांचे वाढवलेले भाव तत्काळ कमी करावेत नसता सरकारचे हे धोरण शेतकऱ्यांसाठी मरण ठरेल असे शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा