एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी : राहुल गांधींचा मोदींना टोला




नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला दररोज टोले लगावत आहे. रोज काही ना काही ट्विट करून त्यांनी मोदी सरकार विरोधात एक प्रकारचे ट्विटर वॉरच सुरू केले आहे. आजही त्यांनी नवे ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.राहुल गांधी यांनी आज मोदींवर अत्यंत खोचक ट्विट केले आहे. ‘एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी’, असे ट्विट राहुल यांनी केले आहे.राहुल यांच्या टीकेमागे संदर्भ आहे. तो म्हणजे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांच्या विधानाचा. केंद्र सरकारने लसींचा पुरेसा स्टॉक नसल्याचं माहीत असतानाच लसीकरण मोहीम सुरू केली. शिवाय 45 आणि नंतर 18 वर्षांवरील व्यक्तिंनाही लस देण्याची घोषणा केली. केंद्राकडे कोणतंही नियोजन नव्हतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईनकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे जाधव यांनी म्हटले होते. जाधव यांच्या या वक्तव्याची बातमीही राहुल यांनी ट्विटमध्ये शेअर केलेली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा